वृत्तपत्रलेखक शांताराम वाघ यांना वृत्तपत्रलेखनातील पुरस्कार जाहीर

पिंपरी-चिंचवड ( सह्याद्री बुलेटिन ) २७ सप्टेंबर : वृत्तपत्रलेखक शांताराम वाघ यांना वृत्तपत्रलेखनातील पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वाघ यांनी अनेक वर्षापासून वर्तमानपत्रांत सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय विषयावर पत्रलेखन केले आहे. अनेक सामाजिक प्रश्नांना त्यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्या पत्राद्वारे वाचा फोडली आहे.विविध वर्तमानपत्रातून प्रसिध्द झालेल्या त्यांच्या पत्राची संख्या १००० पेक्षाही जास्त आहे. पत्राबरोबर त्यांचे अनेक लेखही प्रथितयश वर्तमानपत्र तसेच मासिकांत प्रसिध्द झालेले आहेत.
वाघ हे अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड औदयोगिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या पत्रलेखनाची दखल इंचलकरंजी येथील वृत्तपत्र लेखक संघाने घेतली असून त्यांना ‘आचार्य शांताराम बापू गरूड पत्रलेखन पुरस्कार ’ जाहीर केला आहे. इंचलकरंजी येथे रविवार दि. ३० सप्टेंबर २०१८ रोजी हा पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक मा.श्री.नवनाथ गोरे यांच्या हस्ते व आकाशवाणी कोल्हापुरचे केंद्र संचालक श्रीपाद कहाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली दिला जाणार आहे. शांताराम वाघ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Review