महिला पोलीस कॉन्स्टेबल निलिमा गायकवाड यांचे सर्वत्र कौतुक...

महिला पोलीस कॉन्स्टेबल निलिमा गायकवाड यांनी मुठा उजवा कालवा फुटल्याने दांडेकर पूल परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीवेळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्वांकडून कौतुक होत आहे. स्वतः पाण्यात उतरुन एका लहान मुलाला आपल्या पाठीवर घेऊन निलिमा यांनी अत्यंत्य धाडसाने आपले कर्तव्य पार पाडले. त्यांच्या या कार्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आपत्कालिन परिस्थितीत त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय कार्याची सर्वत्र चर्चा आहे. निलिमा गायकवाड या दत्तवाडी पोलीस चौकीच्या महिला कॉन्स्टेबल आहेत.

Review