अभिनेत्री रीमा लागू यांचा शेवटचा चित्रपट ‘होम स्वीट होम’

अभिनेत्री रीमा लागू यांचा शेवटचा चित्रपट म्हणून जा चित्रपटाकडे पहिले जात तो म्हणजे ‘होम स्वीट होम’ दिग्दर्शक म्हणून अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीचा हा पहिला चित्रपट. रिमा लागू यांनी गेल्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. पण, त्यांचं अस्तित्व कलाकृतींच्या माध्यमातून आजही आपल्यामध्ये आहे. रिमा यांचा हा शेवटचा चित्रपट. रिमा लागू, मोहन जोशी, सुमित राघवन, स्पृहा जोशी यांच्या सुरेख अभिनयाने हा चित्रपट नटला आहे.महाजन (मोहन जोशी) यांची ही कहाणी. यामध्ये हृषिकेश जोशी दलालाची भूमिका साकारत आहे. असंच एके दिवशी महाजन जोडप्याला त्यांच्या राहत्या घराची किंमत साडेतीन कोटी असल्याचं कळतं. इथूनच मूळ कथेला सुरुवात होते. घर विकण्याबाबत मतं- मतांतरं, बदललेला काळ, बदललेला दृष्टिकोन हे सर्व पुढे कथेत पाहायला मिळतं.मोहन जोशी आणि रिमा लागू यांचं सहज अभिनय मन जिंकून घेतं. सोबतीला सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांची ‘नात्याचे रुटीन चेकअप’ सांगणारी त्यांच्याच आवाजातील सुंदर कविता आहे.

Review