घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे... स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरबरोबर आता सीएनजीही महाग

भारतीयांची अवस्था हि "घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे" अशी झाली आहे, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरबरोबर आता सीएनजीही महाग झाले आहे. त्याचबरोबर विमान इंधनाचे (एटीएफ) देशांतर्गत दर २६५० रूपये प्रति किलोलीटर वाढल्यामुळे हवाई प्रवासासाठी आता खिसा रिकामा करावा लागणार आहे. नवीन किमती या रविवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.
सबसिडी असलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत २.८९ रुपयांनी वाढून ती ५०२.४ रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. दिल्लीत विना सबसिडी असलेला सिलिंडर ५९ रुपयांनी महाग झाला आहे. इंडियन ऑइलने जारी केलेल्या निवेदनानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या किंमती आणि विदेश मुद्रा विनिमय दरातील चढ-उतारामुळे ही वाढ करण्यात आली आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर असलेल्या ग्राहकाच्या बँक खात्यात ऑक्टोबरमध्ये ३७६.६० रुपये प्रति सिलिंडर सबसिडी जमा केली जाईल. सप्टेंबर महिन्यात ३२०.४९ रुपये होत होती. दरम्यान, काँग्रेचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याप्रकरणी केंद्र सरकारवर टीका केली आहे. दिल्ली आणि आजूबाजूच्या शहरातही रविवारी मध्यरात्रीपासून सीएनजी महाग झाले आहे. नोएडा आणि गाझियाबाद येथे १.९५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. विमान इंधनाच्या (एटीएफ) देशांतर्गत दरात २६५० रुपये प्रति किलालीटरची वाढ झाली आहे. ही वाढ १ ऑक्टोबरपासून लागू होईल. गेल्या महिन्यात एटीएफच्या दरात २२५० रुपये प्रति किलोलीटर वाढ झाली होती. पेट्रोल दर वाढीमुळे जनता हैराण तर झालीच पण यातच हि भर पडत आहे.

Review