पशुचिकीत्सा व्यवसायी संघटना महाराष्ट्र अध्यक्ष पदावर डाॅ. दिलीप धानके यांची बिनविरोध निवड

मुंबई - पशुसंवर्धन विभागातील  ठाणे जिल्हा परिषदेचे पशुवैदयकीय अधिकारी डॉ. दिलीप धानके यांची काल कल्याण येथे झालेल्या पशुवैदयकांच्या भव्य सभेत पशुचिकीत्सा व्यवसायी संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष पदावर एकमताने ठराव करुन निवड करण्यात आली.संघटनेचे राज्य अध्यक्ष डाॅ. सुनील काटकर व राज्य सरचिटणीस डाॅ.मारोती कानोले यांनी त्यांचे नावाची घोषणा करताच सर्वांनी एकमुखाने अनुमोदन दिले.डाॅ. धानके हे शहापूर तालुक्यातील भूमीपुत्र असून ते एक अभ्यासू पशुचिकीत्सक व कर्मचारी नेते आहेत.गेल्या पंचवीस वर्षापासून ते राज्यभर सामाजिक आंदोलनात विविध संघटना मध्ये कार्यरत आहेत.अनेक सामाजिक व कर्मचारी लढे त्यांनी लढले आहेत.तसेच ते एक उत्तम साहित्यिक असून त्यांची पंचवीसहून अधिक पुस्तके व कॅसेट प्रकाशित झाली आहेत.त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभागात त्यांनी राज्यातील पहिले शेतकरी वाचनालय व बळीराजा वस्तू संग्रहालय किन्हवली येथे पशुवैदयकीय दवाखान्यात स्थापन केले आहे.ते ग्रामीण भागात विविध शेतकरी शिबीरे आयोजित करून प्रशिक्षण देत असतात.अभ्यासू व आक्रमक नेतृत्व व सामाजिक चळवळीतील मुलूख मैदानी तोफ व शिवचरीत्र व भारतीय संविधानाचे व्याख्याते म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे.तसेच सध्या ते जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या सामाजिक चळवळीचे अध्यक्ष आहेत.असे बहुआयामी नेतृत्व पशुचिकीत्सकांचे संघटनेला मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. याच सभेत ठाणे जिल्हा कार्यकारिणी सुद्धा निवडण्यात आली आहे यामध्ये डाॅ. शेखर देशमुख(कार्याध्यक्ष),डाॅ. प्रमोद गिरी(उपाध्यक्ष),डाॅ. यशवंत आंधळे (उपाध्यक्ष),डाॅ. भागवत दौंड(सचिव),डाॅ. दिपक करण(कोषाध्यक्ष),डाॅ. भगवान पाटील(सहसचिव),डाॅ. गौरीकृपा निपुर्ते (महीला संघटक)व जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून डाॅ. अतिष काशीद, डाॅ. सोमेश्वर हल्लूर तसेच तालुका सचिव म्हणून डाॅ. अर्जुन मोहपे(मुरबाड),डाॅ. अरुण जाधव(कल्याण),डाॅ. मनोहर चन्ने(भिवंडी),डाॅ. मुकूंद शिंदे (शहापूर),डाॅ. विलास पाटील (अंबरनाथ)डाॅ. नरेश भोईर(ठाणे) इत्यादी पशुचिकीत्सकांची जिल्हा कार्यकारिणी म्हणून निवड करण्यात आली.यावेळी नुतन जिल्हा अध्यक्ष डाॅ. दिलीप धानके यांनी पशुचिकीत्सकांच्या सोबत राहून न्यायाला माथा व अन्यायाला लाथा हेच संघटनेचे धोरण राहील असे आपल्या भाषणात आक्रमकपणे मांडले.तसेच ते म्हणाले की वाडी वस्तीवर शेतकरी पशुपालक यांचे पशुधनासाठी रांत्रदिवस सेवा देणारा पहीला पशुसेवक हा आमच्याच संवर्गाचा आहे. आमची संघटना शासनाला पूर्ण सहकार्य करील परंतू आमच्यावर अन्याय झाला तर संघटना ठाणे जिल्ह्यात असहकार व कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसायला देखील समर्थ आहोत.डाॅ. धानके यांचे निवडीचे सामाजिक व राजकीय पातळीवर सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Review