आंबेडकर-ओवेसी युतीमुळे काँग्रेसचे नुकसान ?

औरंगाबादमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि ओवेसी यांच्या एमआयएमने एकत्र येत नव्या राजकीय समीकरणाची नांदी केली. दलित-मुस्लिमांची मोट बांधण्याचा हा प्रयत्न आहे. आंबेडकर आणि ओवेसी एकत्र आल्याने त्याचा राजकीय फायदा शेवटी भाजपलाच होणार आहे. कारण ओवेसी-आंबेडकर यांची आघाडी काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पाडणार हे निश्चित आहे.भाजप सरकारच्या विरोधात दुसऱ्या स्वातंत्र्यलढय़ाची घोषणा ऐतिहासिक सेवाग्राममधून काँग्रेसने केली असतानाच औरंगाबादमध्ये प्रकाश आंबेडकर-असदुद्दीन ओवेसी यांच्या युतीमुळे राज्यात भाजपचा फायदा होऊन काँग्रेसचे नुकसान होऊ शकते.
औरंगाबादमध्ये झालेल्या प्रचंड सभेमुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून भाजपच्या गोटात मात्र शांतता दिसत आहे.

Review