सासवड येथे आढळला शीर नसलेला मृतदेह

सासवड येथील किर्लोस्कर कंपनीच्या बाजूला महिलेचा शीर नसलेला मृतदेह मंगळवार (दि.2) रोजी रात्री 10 च्या सुमारास आढळून आला.
महिलेचे अंदाजे वय 20 ते 25 वर्ष असावे.
प्रकाश रामचंद्र कदम (वय 56, रा.सासवड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड येथील किर्लोस्कर कंपनीच्या बाजूला असणा-या तार कंपाउंडच्या बाहेरील बाजूस एका 20 ते 25 वर्ष वयोगटातील एका अनोळखी महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला. अज्ञात इसमाने धारदार हत्याराने या अनोळखी स्त्रीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी हा प्रकार केला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

अधिक तपास सासवड पोलीस करत आहेत

Review