तडीपार गुंडांचा बंदोबस्त करावा - खासदार बारणे यांची मागणी

पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी थोपवण्यासाठी राजकीय हस्तेक्षपाला आळा घालून तडीपार गुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा.गुन्हेगारांना मदत करणाऱ्या राजकीय पदाधिका-यांची नोंद ठेवण्यात यावी,अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने खासदार बारणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभम, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांची भेट घेतली. आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, अनंत को-हाळे, अनिता तुतारे, सरिता साने, विजया चव्हाण, विद्या जाधव, वैशाली कुलथे, भाग्यश्री म्हस्के, बाळासाहेब वाल्हेकर, भरत साळुंखे, सर्जेराव मारमोरे, उमेश रजपूत, रामदास केंदळे शिष्टमंडळात होते.

 

Review