लोट्स हॉटेलमधील सेक्स रॅकेट उघडकीस

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील लोट्स हॉटेलमधील सेक्स रॅकेट उघडकीस आले असून एका परदेशी महिलेची सुटका करण्यात आली.आणि एकाला अटक करण्यात आली आहे.
बाळू बाळासाहेब सातपुते (रा.विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू सातपुते हा आपल्या साथीदारांसोबत महिलांना पैशासाठी वेश्या व्यवसाय करण्यास लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कोरेगाव पार्क येथील लोट्स हॉटेलमधील रूमवर छापा टाकून परदेशी महिलेची सुटका केली. बाळू सातपुते याला न्यायालयाने 8 आक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पुढील तपास कोरेगाव पार्क पोलिस करत आहेत.

Review