सरकारने केले जनतेवर उपकार - पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर पाच रुपयांनी स्वस्त...

इंधनाचे दर १०० गाठतील कि काय एवढे वाढले होते. असे झाले असते तर जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले असते, यावर उपाय म्हणून सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली असून हे दर GST
मध्ये न आणता केवळ पाच रुपये कमी केले आहेत, आणि आपण जनतेवर उपकार केले. अशा पद्धतीने याची प्रसिद्धी केली जात आहे.
केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडून कर कपातीची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता प्रतिलिटर 5 रुपयांनी स्वस्त झालं आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून घोषणा केली आहे.
केंद्राने जसा अडीच रुपयाचा दिलासा दिला तसाच दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अडीच रुपयांची कपात करावी, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं होतं. त्यानुसार सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील राज्यात पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर अडीच रुपयांनी स्वस्त करत असल्याची घोषणा केली.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने इंधन दर वाढले आहेत, अशी नवी ? आणि दुर्मिळ ? माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत दिली.

Review