सुमारे एक वर्षाच्या मुलीवर बिहारी तरुणाचा बलात्कार, यू पी आणि बिहार विरोधात गुजराथ मध्ये संतापाची लाट...

एक वर्ष आणि दोन महिन्याच्या लहान मुलीवर बिहारी तरुणाने बलात्कार केल्याने गुजरात मध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुजरातच्या साबरकाठा जिल्ह्यात हि घटना घडली असून आरोपी रविंद्र साहू ( मूळचा बिहारचा ) याला पोलिसांनी अटक केली आहे.
हिंसेच्या भीतीने परराज्यांतून विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या कामगारांनी पलायन करण्यास सुरुवात केली आहे.बुधवारपासून गुजरातच्या गांधीनगर, मेहसाणा, पाटन, साबरकाठा ते अगदी अहमदाबाद या ५ जिल्ह्यांमध्ये यूपी-बिहारींविरोधात हिंसक आंदोलनांनी पेट घेतला आहे. त्यामुळे बिघडलेल्या परिस्थितीमुळे गुजरातमधील अनेक उत्तर प्रदेश आणि बिहारच्या कामगारांनी पळ काढला आहे. मेहसाणा आणि साबरकाठा या जिल्ह्यांमध्ये परिणाम सर्वाधिक जाणवत आहे, तर अहमदाबाद येथून आतापर्यंत 73 आणि गांधीनगर येथून 27 जणांना अटक करण्यात आली आहे. परप्रांतीय ज्या भागात मोठ्या संख्येने रहातात तिथे पोलिसांच्या गस्त वाढवल्या असून परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन गुजरात पोलिसांना सतर्कतेचा आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.

Review