मराठी आणि गुजराथ्यांनो काशी सोडा, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील...
गुजरात आणि महाराष्ट्रातील वाराणसीतील लोकांनी एका आठवड्याच्या आत वाराणसी सोडून जावे अशी धमकी उत्तर प्रदेश-बिहार एकता मंचने दिली आहे.
गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यामुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. उत्तर प्रदेशमध्ये यावरुन मोठा विरोध होत आहे. हे पोस्टर्स उत्तर प्रदेश-बिहार एकता मंचने लावले आहेत. या पोस्टर्समध्ये गुजरात, महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हिंसेचा विरोध करण्यात आला आहे.गुजरात येथील साबरकांठा जिल्ह्यात १४ महिन्याच्या मुलीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर बिगर गुजरातींवर हल्ले करण्यात आले. यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील लोकांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे बाहेरील राज्यातील लोकांना गुजरात सोडण्यास भाग पडले आहे. पीडित कुटुंबीय गुजरातमधील ठाकोर समाजाचे आहेत. त्यामुळे हिंसेत ठाकोर समुदायाचे नाव समोर आले आहे. हिंसाचार केल्याप्रकरणी ३०० हून अधिक लोक अटक करण्यात आले आहे. एका अंदाजानुसार आतापर्यंत दुसऱ्या राज्यातील सुमारे २० हजार लोकांनी गुजरातमधून पलायन केले आहे.