मिटूचा वापर केवळ कोणाला अडकवण्यासाठी व्हायला नको - रामदास आठवले

मिटूबाबत अनेक व्यक्तींवर आरोपी केले जात आहेत त्यानुसार दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मात्र, ज्यावेळी या घटना घडल्या त्याचवेळी याबाबत तक्रार करणे गरजेचे होते. केवळ एखाद्याला अडकवण्यासाठी कोणीही याचा वापर करू नये.असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.पुण्यात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांसह पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना देशात सध्या उठलेल्या मिटूच्या वादळाबाबतही भाष्य केले.

केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरही काही पत्रकार महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

Review