आम्ही दहशत वाद्यांशी लढतोय आणि काश्मिरी लोक आमच्यावर दगडफेक करतात - डीआयजी व्ही. के. बिरदी

‘आम्हाला गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही सीआरपीएफसोबत सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. मात्र लोक आमच्यावरच दगडफेक करत आहेत. अशी माहिती डीआयजी व्ही के बिरदी यांनी दिली.
जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक उडाली आहे. नौगाम येथील सुथू येथे ही चकमक सुरु आहे. चकमकीदरम्यान जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. याआधी बुधवारी दोन्ही बाजूने गोळीबार सुरु झाला होता. ज्यानंतर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.सुरक्षा जवानांनी परिसराला घेराव घातला आहे.

 

Review