राफेल प्रकरणातीळ लक्ष हटविण्यासाठी सीबीआयवर कारवाई?

ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रशांत भूषण यांनी केंद्र सरकार राकेश अस्थाना यांना चौकशीपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करताना राफेल प्रकरणात चौकशी नको म्हणून सीबीआयवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप सरकारवर केला आहे.राकेश अस्थाना यांना वाचवण्यासाठीच आलोक वर्मा यांना हटवण्यात आलं आहे. एम नागेश्वर राव यांच्याविरोधात अनेक आरोप असून आलोक वर्मा यांनीही त्यांना घेऊ नका अशी शिफारस केली होती. एम नागेश्वर राव यांनी भ्रष्टाचाऱ्यांना वाचवल्याचा आरोप आहे. आम्हाला वाटतं राफेल प्रकरणात चौकशी नको, म्हणून सीबीआयवर कारवाई करण्यात आली आहे असा आरोप प्रशांत भूषण यांनी केला आहे.
प्रशांत भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, राफेल प्रकरणी तपास करण्यासंबंधी आपण आलोक वर्मा यांची भेट घेतली होती. यावेळी आपल्यासोबत अरुण शौरी आणि यशवंत सिन्हादेखील होते. सीबीआय संचालकांनी राफेल प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं होतं अशी माहिती प्रशांत भूषण यांनी दिली आहे.

Review