शिवाश्रम जगाला आदर्श देणार- शिवशाहीर डॉ विजय तनपुरे

शिर्डी - सह्याद्री बुलेटिन (साईप्रसाद कुंभकर्ण ) - शिवाश्रम हा सामाजिक क्षेत्रातील मानदंड, मार्गदर्शक तसेच जगाला आदर्श ठरणार आहे, असे प्रतिपादन विश्व शिवशाहीर डॉ विजय तनपुरे यांनी, शिर्डी येथे व्यक्त केले.
शिवाश्रम निर्मिती निमित्ताने दुसरी राज्यस्तरीय बैठक शिर्डी येथील निसर्ग हॉटेल येथे रविवारी २१ तारखेला सकाळी अकरा वाजता पार पडली, या अध्यक्षस्थानी बहुजन समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नंदुभाऊ पवार होते. तर व्यासपीठावर प्रभात डेअरीचे चेअरमन किशोर निर्मळ, आबासाहेब मोरे, उत्तम गाढे आदी उपस्थित होते. सकाळी अकरा वाजता दीपप्रज्वलनाने बैठकीला सुरुवात झाली त्यानंतर शिव स्मरण व शिवगर्जना झाली .
तनपुरे म्हणाले की, जीवनात प्रामाणिकपणाला खुप म्हत्व दिले जाते, तनपुरे यांनी शिवाश्रम विषयावर चर्चा घडवून आणली शिवाश्रममध्ये जात न पात मानवता हाच एक धर्म समजून शिवाश्रमाचे काम सुरू आहे आणि पुढे चालू राहणार, प्रामाणिक पणा हा गुण म्हणजे जीवनातील खुप मोठी शक्ती आहे. शिवाजी महाराज यांच्या विचारातून 18 हजार लोक दारूबंदी केली तर 17 आत्महत्या पासून रोखले आहे किती पैसा कमवला त्यापेक्षा तो कसा कमवला ह्या गोष्टी ला म्हत्व दिले जाते, तन ,मन,धनाने शिवाश्रमासाठी काम करण्यासाठी आपली सर्वांची साथ म्हत्वाची आहे .शिवाश्रम हे सर्वांचे माहेर घर आहे, असे समजून घेऊन आपण काम करत राहणार आहे, सेवा हाच आंनद, शिवाश्रमाचा पाया व इमारत भक्कम करण्यासाठी तन मन धनाने काम करणे गरजेचे आहे, बोलण्यापेक्षा कृती म्हत्वाची आहे. पुढील काळात शिवाश्रम अँप तयार करून त्या माध्यमातून सर्व माहिती ह्या अँप वर माहिती, महाराष्ट्र भर तसेच जगभरात पोहचवली जाणार आहे, त्याचबरोबर निधी विषयावर चर्चा करण्यात आली,शिवाश्रम निर्मिती मध्ये खारीचा वाटा उचलला पाहिजे.

ह्यावेळी दादासाहेब मुंढे, वासुदेव महाराज आर्विकर , शिवा महाले, डॉक्टर अनिल घनवट, संगीता मालकर यांनी ह्यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीला सर्व शिवाश्रम फाउंडेशनचे सदस्य ह्या वेळी उपस्थित होते. प्रस्ताविक हरिष ढगे यांनी केले तर आभार मुकुंद सिनगर यांनी मानले.

Review