अटल बिहारी वाजपेयी यांचा वारसा नरेंद्र मोदी चालवत आहेत - रामदास आठवले

माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांचा वारसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चालवत असून लोकप्रिय सक्षम प्रधानमंत्री ठरले आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकारने जे निर्णय घेण्याची हिंमत केली नाही ती हिंमत मोदी सरकारने दाखवली आहे. पाकिस्तानचे कंबरडे मोडणारा सर्जिकल स्ट्राईक मोदी सरकारने केला आहे अशा शब्दांत रामदास आठवलेंनी कौतुक केलं आहे.
2019 च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला जनता पुन्हा निवडून देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.देशाच्या विकासासाठी सबका साथ सबका विकास हे मोदींचं सूत्र योग्य ठरले असून त्यानुसार विकासासाठी पुन्हा जनता मोदींच्याच नेतृत्वातील एनडीए सरकारला संधी देणार आहे. देशासमोर एनडीए हाच समर्थ पर्याय आहे. विरोधकांच्या एकजुटीला फुटीचे ग्रहण लागले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वात देशाला स्थिर आणि विकसनशील सरकार मिळू शकते असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी काँग्रेसने इंदूमिलची जमीन देण्यास टाळटाळ केली. मात्र प्रधानममंत्री नरेंद्र मोदींनी त्वरित निर्णय घेऊन जमीन स्माकासाठी हस्तांतरित केली. उज्वला योजना तसेच अनेक सामाजिक न्यायाच्या योजना मोदींच्या नेतृत्वात राबविण्यात आल्या आहेत. रस्ते विकासाचे अनेक प्रकल्प उभारले आहेत.

Review