पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा वाहतूक नियंत्रण कक्ष आजपासून कार्यान्वित...
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे वाहतूक नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून हा कक्ष वाकड येथील जुन्या पोलीस ठाण्यातील इमारतीत सुरु करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.
पिंपरी-चिंचवडचे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यापासून स्वतंत्रपणे वाहतूक नियंत्रण कक्ष सुरु करण्याचे काम सुरु होते. यामुळे नियंत्रण कक्षासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती २८ ऑगस्ट रोजी घेण्यात आल्या होत्या.