जनहिताची कामे प्राधान्याने पुर्ण करणार - स्थायी समिती अध्यक्ष्यांचे आश्वासन
जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ करून, जनहिताच्या कामाला प्राधान्य देणार आणि पदाचा वापर लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी करणार, असे आश्वासन स्थायी समिती अध्यक्षा ममताताई विनायक गायकवाड यांनी दिले.
प्रभाग क्रमांक २५ मधील वाकड येथील रस्त्यांच्या तक्रारींबाबत स्वीकृत सदस्य कांतीलाल भूमकर व सौ.भरतीताई विनोदे (सदस्य-महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण नियंत्रण समिती व महिला अध्यक्षा,भाजपा) यांनी गायकवाड यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.
प्रभाग क्र.२५ मधील वाकड गावठाण मधील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करणे, भुजबळ वस्ती ते भूमकर वस्ती हिंजवाडीकडे एम. डी. आर.३१ रस्त्याला जोडणारा ३०मी. रुंदीचा डी. पी. रस्ता विकसित करणे, भुजबळ वस्ती ते हिंजवडी हद्दीपर्यंत विकास योजनेतील २४ व ३० मी रुंदीचा रस्ता विकसित करणे व पुणे बेंगलोर महामार्गावरील पुलापासून हिंजवडी मनपा हद्दीपर्यंत रस्ता रुंदीकरण करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी नागरिकांच्या मागणीनुसार व लोकहितासाठी ही कामे लवकरात लवकर करण्यात यावी अशी विनंती यांच्यामार्फत करण्यात आली यावेळी या कामांचा योग्य तो पाठपुरावा करून ही कामे लवकरात लवकर करण्यात येतील असे स्थायी समिती अध्यक्षा ममताताई विनायक गायकवाड यांनी सांगितले.