शिवस्मारकावरून सरकारचा जुमला आणि मेटेंचा स्टंट - दामोदर तांडेल

शिवस्मारकाची जागाच चुकीची असून हे स्मारक कधीही होणार नाही हा सगळा निवडणुकीचा जुमला आहे आणि विनायक मेटेंनी स्टंट केला आहे असा आरोप मच्छिमार नेते दामोदर तांडेल यांनी केला आहे.
या समुद्राची आमच्याएवढी कुणाला माहिती असू शकत नाही, असं सांगताना तांडेल यांनी या स्मारकाच्या संकल्पनेवरच आक्षेप घेतला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना तांडेल यांनी याठिकाणी शिवस्मारक होणे शक्य नसून हा सगळा निवडणुकीसाठीचा जुमला असल्याचा आरोप केला. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दाखला देताना सांगितलं की मोदीही जलपूजनाच्यावेळी ज्या जागी प्रस्तावित शिवस्मारकाची जागा आहे, तिथं गेलेच नव्हते व दुसरीकडेच जलपूजन केले होते. ज्याठिकाणी शिवस्मारकाची जागा निश्चित करण्यात आली आहे तिथं स्पीड बोटी जाऊ शकत नाहीत, आम्हीही त्या भागात जात नाही असं सांगताना तांडेल यांनी या भागाची कसलीही कल्पना नसताना असे प्रकार केले जातात असे म्हटले आहे.

Review