दुष्काळावर सरकारने गांभीर्याने उपाययोजना कराव्यात - शरद पवार

दुष्काळाचे गांभीर्य समजून पुढील आठ-नऊ महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना, जनावरांना चारा अशा उपाययोजना गांभीर्याने कराव्यात, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला केल्या आहेत केल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत ऊस पीक आणि दुष्काळ असे विरोधाभासी चित्र दिसते. त्यावरचे मत व्यक्त करताना पवार म्हणाले,की काही दिवसांपूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्यावतीने राज्यातील आठ-नऊ तज्ज्ञांबरोबर फ्रान्स, नेदरलँड, स्पेन, बेल्जियम या देशांचा दौरा केला. त्यात बीट उत्पादनापासून साखर कशी तयार होते, याची माहिती घेतली. उसाला लागणारे पाणी आणि बिटाला लागणारे पाणी यात अंतर आहे. शर्करांशही अधिक असल्याने ऊस कारखान्याच्या परिसरात येत्या काळात बीट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याची व्यवस्था करावी लागेल, असे ते म्हणाले. उजनीतून सोलापूरला पाणी मिळत असल्यामुळे तेथील उसाची चिंता नाही. मात्र, अन्य ठिकाणी पीक पद्धतीत बदल करायचा असल्यास हा पर्याय असू शकतो, असे ते म्हणाले. जलसंवर्धनाच्या सगळ्या कामांना आमचा पाठिंबा असेल. मात्र, जलयुक्त शिवारबाबत ऐकू येणारे सर्व अहवाल चिंताजनक आहेत. त्याकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहायला हवे.

कर्जमाफीचा शेतकऱ्यांना आधार मिळाला नाही. शेवटपर्यंत कर्जमाफी पोहोचलेलीच नाही. ऑनलाईनची दुकाने थाटली गेली,मात्र त्याचा फायदा झाला नसल्याची टीका पवार यांनी केली.

Review