नरेंद्र मोदी डेंग्यूचा मोठा डास आणि सोलापूरचे खासदार बेवडा - आमदार प्रणिती शिंदे
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी नरेंद्र मोदी डेंग्यूचा मोठा डास आणि सोलापूरचे खासदार बेवडा अशा शब्दात टीका केली आहे.
सोलापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आपल्या देशात सर्वात मोठा डेंग्यूचा डास आला आहे, त्यांचं नाव आहे मोदीबाबा, फवारणी करुन या डासाला पुढच्या वर्षी हाकलून लावायचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना आजार होतोय असं प्रणिती शिंदेंनी म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी सोलापूरचे खासदार शरद बनसोडेंचा भाषणात बेवडा म्हणून उल्लेख केला.