जिथे पोलीसच सुरक्षित नाहीत तिथे सामान्य जनतेचे काय? जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे उपनिरीक्षक इम्तियाज अहमद मीर यांची हत्या...
जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे उपनिरीक्षक इम्तियाज अहमद मीर (वय ३०) आपल्या घरी जात होते, त्यावेळी संवेदनशील असलेल्या पुलवामातील वहीबाग परिसरात दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यांचा मृतदेह जेव्हा त्यांच्या गावी आणला. त्यावेळी जमावाकडून तिथेही दगडफेक करण्यात आली. मीर हे जम्मू-काश्मीर पोलीस दलात सीआयडी विभागात कार्यरत होते. अनेक दिवसांपासून ते आपल्या आई-वडिलांची भेट घेऊ शकले नव्हते. पेहराव बदलल्यास दहशतवादी आपल्याला ओळखू शकणार नाहीत, असे त्यांना वाटले होते.
गेल्यावर्षी त्यांची कुलगाम येथे बदली झाली होती. त्यानंतर याचवर्षी मार्चमध्ये त्यांची सीआयडीमध्ये बदली करण्यात आली होती. मीर यांचे वडीलही पोलीस दलात अधिकारी होते. दक्षिण काश्मीरमधील गांदरबल येथे ते पाच वर्षे कार्यरत होते.