वाघीरे महाविद्यालयात उत्पन्न व अधिवास दाखला वाटप शिबीर

पुणे (सह्याद्री बुलेटिन) - पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व सासवड तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने उत्पन्न व अधिवास दाखला वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मंडल अधिकारी बी.एस. भिसे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य एस. व्ही. ढगे कार्यक्रम अधिकारी डॉ. किशोर लिपारे आदी उपस्थित होते.
सासवडचे तहसीलदार अतुल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक कारणासाठी लागणारे उत्पन्न व अधिवास दाखला सहजरित्या देण्यासाठीमहसूल विभागाचे तलाठी वणवे एस. एस. (राजेवाडी), एम. एन. भोंगळे (आंबळे), एस. एस. काशीद (माळशिरस), बी. इ. दरेकर, पी. एस. झुरुंगे (परींचे), बी.डी. मोकाशी (पारगाव), आर.एन.शेळके(पारगाव) एस.एस.कांबळे (दिवे)पी. टी. राठोड (घेरापुरंदर), बी. एस. ढमढेरे (सासवड), अवधूत खैरे (सेतू व्यवस्थापक), प्रसाद पोतदार (सेतू कर्मचारी) आदी सेवकांचे या शिबिरात सहकार्य लाभले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रिया, शिष्यवृत्तीसाठी लागणारे दाखले काढण्यासाठी विध्यार्थी व पालकांना धावपळ करावी लागते. वेळेत पाठपुरावा केला नाहीतर त्यास विलंब होऊन कदाचित प्रवेश तसेच शिष्यवृत्ती यापासून विध्यार्थ्यांना वंचित राहावे लागते. म्हणून अर्ज केल्यानंतर निश्चित शिबिराच्या ठिकाणी विध्यार्थ्यांना दाखला मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. असे सांगितले.

या शिबिरात चौऱ्यांनव (९४) दाखल्यांचे वितरण प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर. बी. जाधव यांनी केले तर संयोजन व आभार डॉ. किशोर लिपारे यांनी केले.

Review