कोल्हार भगवतीपुर येथील कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

अ.नगर ( सह्याद्री बुलेटिन ) साईप्रसाद कुंभकर्ण - औरंगाबाद येथे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गाड्यांचा ताफा अडवून त्यांना राजकीय हेतूने त्रास देण्याच्या प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ कोल्हार भगवतीपुर येथील कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून रास्ता रोको करीत आमदार प्रशांत बंब यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे  मारीत तीव्र निषेध व्यक्त केला

सकाळी कोल्हार भगवतीपुर चे ग्रामदैवत भगवती माता मंदिराच्या प्रांगणा पासून निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात घोषणा दिल्या यावेळी कार्यकर्त्यांनी नगर-मनमाड राज्यमार्गावर काही वेळ रास्ता रोको करीत राज्यमार्गा  वर निषेध सभा घेतली यावेळी आमदार प्रशांत बंब यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास  जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी भाऊसाहेब खर्डे पाटील भगवतीपुरचे सरपंच रावसाहेब खर्डे पाटील कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच ज्ञानेश्वर खर्डे पाटील माजी उपसरपंच स्वप्निल निबे उद्योजक नितीनशेठ कुंकूलोळ श्रीकांत खर्डे पाटील संभाजी देवकर पाटील विखे कारखान्याचे संचालक विजय खर्डे पाटील प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष अशोक असावा साहेबराव दळे पाटील नंदकुमार खांदे बाब्बा  शेख यांचेसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नामदार विखे पाटील यांचा गाड्यांचा ताफा अडविण्यावर गुन्हे दाखल करावेत व ना विखे यांच्या सुरक्षेत वाढ करावी अशा आशयाचे निवेदन यावेळी लोणी पोलीस स्टेशन चे ए पी आय प्रवीण पाटील यांना देण्यात आले

Review