भ्रष्टाचार संपल्याशिवाय देश विकसनशील होणार नाही : दादा इदाते
पिंपरी ( सह्याद्री बुलेटीन ) - भारतातील जातीयता समूळ नष्ट झाल्याशिवाय व भ्रष्टाचार संपल्याशिवाय भारत देश कधीच विकसनशील होवू शकणार नाही, असे मत राष्ट्रीय जाती जमाती आयोग भारत सरकारचे अध्यक्ष दादा इदाते यांनी व्यक्त केले.
लाईफ ग्लोबल वेलफेअर फाउंडेशन संस्थेच्या वतीने गौरव महाराष्ट्र पुरस्काराचे आयोजन पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह याठिकाणी करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी महिला मोटीव्हेशनल ट्रेनर चैताली चटर्जी, सुसंपन्न ज्ञानप्रसारक मंडळाचे संस्थापक झ.पा.ढाकणे, युवा उद्योजक डॉ. सतीश खर्डे पाटील, काव्यमित्र संस्थेचे संस्थापक राजेंद्र सगर आदी उपस्थित होते.
यावेळी संशोधनात्मक कार्यासाठी डॉ. सुनील चौधरी यांना राष्ट्रीय वैद्यकीय सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच सयाजी क्षीरसागर (प्रशासकीय सेवा पुरस्कार), राहुल शिंदे (राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार), संगीता भापसे (राष्ट्रीय शिक्षणसेवा पुरस्कार) पूजा जाधव (उत्कृष्ट समुपदेशिका पुरस्कार), संदीप वाघोले (साहित्य सेवा पुरस्कार) प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन नारायणकुमार फड यांनी केले होते.
रिता सेठिया यांनी सूत्रसंचालन केले. संजय जगताप यांनी आभार मानले.