१४ लोकांचा जीव घेणाऱ्या वाघिणीला ठार मारले... प्राणीप्रेमींना सुतक... अरेरे...
१४ जणांचा जीव घेणाऱ्या यवतमाळ येथील पांढरकवडा मधील नरभक्षक टी-१ वाघिणीला शुक्रवारी ठार करण्यात आले. पण प्राणी प्रिय मंडळींना मात्र सुतक पडले आहे, १४ लोकांचा जीव घेतला याच्या दुःखापेक्षा या वाघिणीला बेशुद्ध करण्याचा कोणताही प्रयत्न न करता ठार करण्यात आल्याचे जास्त दुःख आहे.
हैद्राबादचा नेमबाज नवाब शफात अली खान यांचा मुलगा असगरने वाघिणीला गोळी घातली. यावेळी एकही पशुवैद्यक त्याच्यासोबत नव्हता. वनखात्याकडून यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. वाघिणीला शांततापूर्ण मार्गाने बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करा असे या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.
वाघिणीच्या दहशतीमुळे केळापूर, राळेगाव, कळंब या ठिकाणची शेतीची कामे ठप्प झाली होती. या तालुक्यांमध्ये वाघिणीनं धुमाकूळ घातला होता. पांढरकवडा वन विभागातील राळेगाव आणि पांढरकवडा या ठिकाणी या वाघिणीची सर्वात जास्त दहशत होती. लोणी, सराटी, खैरगाव, विहिरगाव, येडशी, मिरा, तेजनी या गावांमध्येही वाघिणीची चांगलीच दहशत होती. आता तिला ठार करण्यात आल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.यवतमाळ येथील पांढरकवडा भागात दहशत माजवणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात अखेर वन विभागाला यश आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून या वाघिणीने धुमाकूळ घातला होता. टी१ या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी मागच्या दीड महिन्यापासून वन विभागाचे कसोशीचे प्रयत्न सुरु होते. अखेर शुक्रवारी रात्री वन विभागाच्या बचाव पथकाने गोळी घालून या वाघिणीला ठार केलं.