दिवाळीनंतर राम मंदिर निर्माणाचे काम सुरू ?
दिवाळीनंतर राम मंदिर निर्माणाचे काम सुरू होऊ शकते असा विश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.
राजस्थानच्या बिकानेर येथे योगी आदित्यनाथ पोहोचले होते. यावेळी ते बोलत होते.
‘यंदा एक दिवा प्रभू रामचंद्राच्या नावाने पेटवा, तेथे काम लवकरच सुरू होईन. आपल्याला दिवाळीनंतर हे काम करायचंय’ असं ते म्हणाले.
अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न सध्या देशभरात चांगलाच चर्चेत आहे. कधी अध्यादेश काढण्याची मागणी होत आहे, तर सरकार राम मंदिरासंबंधीचा कायदा आणू शकतं अशीही चर्चा होत आहे.