राम मंदिर हे तर माझं स्वप्न - उमा भारती
केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी राम मंदिरावर भाष्य केले असून, मी राम जन्मभूमी आंदोलनात सक्रिय होते. त्याबाबतची सुनावणी अद्यापही सुरू आहे. राम मंदिर बांधलं जावं हे माझं स्वप्न आहे. यासाठी माझ्याकडून जी मदत हवी असेल ते करायला मी तयार आहे असं म्हटलं आहे.
राम मंदिराचं प्रकरण न्यायालयात आहे, पण लवकरात लवकर यावर निर्णय यावा अशी आमची इच्छा आहे. जर न्यायालयाच्या निकालाला विलंब होत असेल तर राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा, अशी माझी मागणी हि भाजपच्या खासदार आणि मंत्र्यांकडूनही होत आहे.