साफ सफाई कर्मचाऱ्यांचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे-प्रा उत्तम केंदळे
दरवर्षी प्रमाणे नगसेवक प्रा.उत्तम केंदळे आणि बापू घोलप यांनी प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यासोबत दिवाळी साजरी केली. या वेळी सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देत त्यांना आणि त्यांच्या परिवारास शुभेच्छा दिल्या.आणि आपण जिवन जगत असताना दिवाळी भेट सगळ्यांना देतोच परंतु स्वताच्या आत्मसमाधान,आनंद,स्वताचा आनंद गरिब आणि जे कोणीच काम करू शकत नाही असे काम करणाऱ्यांचा पन सन्मान प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे असा विचार केंदळे यांनी मांडला.सफाई कर्मचारी दररोज नागरिकांच्या घरातील कचरा उचलतात प्रभाग आणि शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने काम करतात यामूळे शहर स्वच्छतेचे उदिष्ट पुर्ण होत असते.
अशा कर्मचाऱ्यासोबत एक नगरसेवक दिवाळी साजरी करुन कर्मचार्याचा सन्मान करणारा एक वेगळा उपक्रम आणि गरीबांबरोबर राहणारा व सुख दुःखात सहभागी होणारा नगरसेवक असा उल्लेख सर्व कर्मचारी करत होते.कर्मचाऱ्यांच्या भावना व्यक्त होताना दिसत होत्या त्यांच्या सर्वांच्या वतीने केंदळे यांना शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी भाजप नेते बापू घोलप,सामाजिक कार्यकर्ते नारायण पाटिल,गोरख कोलते,उमेश घोडेकर,प्रभु बालचंद्रन,कौस्तुभ देशपांडे,विशाल केंदळे,गणेश साठे इ. उपस्थित होते.