तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते नारायण रेड़्डी यांची दगडाने ठेचून हत्या

तेलंगणामध्ये विकराबाद जिल्ह्यातील सुलतानपूर गावात तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) नेता नारायण रेड़्डी यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.
मंगळवारी सकाळी नारायण रेड्डी यांचा मृतदेह सापडला. रेड्डी यांच्या हत्येची माहिती मिळताच आक्रमक झालेल्या त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. दोन्ही कार्यकर्त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, रविवारी रेड्डी गट आणि त्यांच्या प्रतिस्पर्धकाच्या गटामध्ये वाद झाला होता. त्यानंतर उसळलेल्या संघर्षात टीआरएसच्या नेत्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहे.

Review