एका रात्रीत बदलले स्टेडियमचे नाव, योगीचा नामांतर योग...
भारत आणि वेस्ट इंडिजमधील ट्वेन्टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज लखनौच्या ‘इकाना’ स्टेडियमवर होणार आहे. मात्र, सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधीच या स्टेडियमचं नाव बदलण्यात आलं आहे.सामना सुरू होण्याच्या एका रात्री आधीच योगी सरकारने इकाना स्टेडियमचं नाव बदलून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं नाव दिलं आहे. त्यामुळे आता ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम’ या नावाने हे स्टेडियम ओळखलं जाणार आहे. या निर्णयाला उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनीही तातडीने मंजुरी दिली आहे.
एका पत्रकाद्वारे उत्तर प्रदेश सरकारकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर, आज सकाळी अधिकृतपणे योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या उपस्थितीत स्टेडियमचं नाव बदलण्यात आलं.