वाकी बुद्रुक गावच्या उपसरपंचपदी विकास जाधव यांची बिनविरोध निवड
वाकी बुद्रुक ( सह्याद्री बुलेटिन ) - वाकी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी विकास जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. लोकनियुक्त सरपंच वैशाली दत्तात्रय जरे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच नियंत्रण अधिकारी,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस.बी.कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.
उपसरपंच पदासाठी विकास शंकर जाधव,संतोष दिलीप गारगोटे यांचे अर्ज आले होते. त्यानंतर संतोष गारगोटे यांनी माघार घेतली व उपसरपंच पदी विकास जाधव यांची निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले. निवड झाल्यानंतर ग्रामस्थ तसेच मावळते सरपंच विनोद उर्फ़ पप्पूदादा टोपे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक प्रक्रियेसाठी सरपंच वैशाली जरे व् सदस्य सुनिता गोविंद कड , रेखा टोपे, विनोद उर्फ़ पप्पूदादा टोपे, राजश्री विश्वास टोपे, संतोष दिलीप गारगोटे, कावेरी प्रवीण टोपे, विठोबा रामभाऊ गारगोटे उपस्थित होते
विकास जाधव यांनी ग्रामस्थांचे आभार मानले व येत्या काळात वाकी गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहिल असे आश्वासन दिले,