अवनीच्या शिकारीवरून मंत्रीमंडळाच्या बैठकीत भाजप-सेनेची खडाजंगी
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळानं चार मोठे निर्णय घेतले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीला भाजपाच्या मंत्र्यांबरोबरच शिवसेनेचे मंत्री उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजपाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अवनीच्या हत्येसंदर्भात जाब विचारला. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत भाजपा आणि सेनेच्या मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली. परंतु बैठकीत असं काहीही झालं नसल्याचा खुलासा मुनगंटीवारांनी केला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत सर्वांसाठी घरे-२०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या धोरणांतर्गत पात्र लाभधारकांना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची जमीन उपलब्ध होण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यासह शासकीय तसेच गायरान जमिनी तातडीने देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.