राजस्थानात आऊट गोइंग सुरु झाले, राजकीय हवेनुसार ढग बरसायला लागले...

राजस्थान विधानसभा निवडणुकीची हवा भाजपाला मानवणारी नाही अशी राजकीय भाकिते समोर येत आहेत. यामुळे आयात केलेले आयाराम परतीच्या वाटेला लागले आहेत.
राजस्थानमधील दौसा लोकसभा मतदारसंघाचे खासदार हरीश मीना यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट आणि सरचिटणीस अशोक गहलोत यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला.
तसेच नागौर मतदारसंघातील भाजपाचे आमदार हबीब उर रहमान यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपा उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव आले नव्हते. त्यानंतर त्यांनी नाराज होत पक्षाचा त्याग केला होता.
आमची घरवापसी झाली आहे. पूर्वी थोडा नाराज होतो, म्हणून पक्ष सोडला होता. आता नाराजी दूर झाली आहे. कोणत्याही अटींशिवाय मी काँग्रेसमध्ये सहभागी झालो आहे. पक्ष जो सांगेल ते काम मी करेन असे म्हणत भाजपाने काहीच काम केले नसल्याचा आरोप करत अनेक नेते परतीच्या प्रवासाला लागले आहेत.

Review