महाराष्ट्रातील मावळ्यांच्या आग्रा मोहिमेने पुन्हा इतिहासाला जाग येणार...
कोल्हार ( सह्याद्री बुलेटिन ) साईप्रसाद कुंभकर्ण - छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या तावडीतून धाडसाने आग्र्याहून सुटका केल्याच्या घडलेल्या घटनेला 351 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्रातील मावळे आग्रा मोहिमेचा इतिहास पुन्हा जागा करणार आहेत
दुचाकीवरून राजगड ते आग्रा व आग्रा ते राजगड अशी तब्बल साडेसात हजार किलोमीटरची साहसी रैली आखण्यात आली असून 10 नोव्हेंबर पासून मावळे या मोहिमेवर निघाले आहेत
हि रेली कोल्हार येथे आली असता या रेलीचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी कोल्हार येथील शिव भक्त गणेश गागरे ,वीरेंद्र गोसावी,अक्षय मोरे ,अमोल खर्डे ,गणेश गोसावी,प्रदीप खर्डे यांनी मोहिमेतील सहभागी झालेल्या तरुणांचा सत्कार केला व चहा पान दिला
या मोहिमे विषयी माहिती देताना संदीप महिंद म्हणाले की मोहिमेत सहभागी होणाऱ्या मावळ्यांना केवळ आपली दुचाकी आणि इंधनाचा खर्च घ्यावा लागेल त्यांचा 10 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान चा मोहिमेतील भोजन व राहण्याचा खर्च संयोजकांकडून केला जाणार आहे
सशक्त भारत या मोहिमेअंतर्गत 76 संस्था आणि संघटनांच्या वतीने ही मोहीम आखण्यात आली आहे नॅशनल इंटिग्रेटेड असे या मोहिमेला नाव देण्यात आले आहे या संपूर्ण मोहिमेत 14 राज्य ९१ जिल्हे पार केले जाणार असून 59 गडकोटांचा इतिहास आणि भुगोलाचे अध्ययन केले जाणार आहे
तब्बल सात हजार 418 किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे
शीख धर्मगुरू गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त शीख बांधवांच्या शोर्याचा जागरही यानिमित्ताने केला जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा सुटके दरम्यान मदत करणाऱ्या अनामिक उत्तर भारतीयांच्या मदतीची आठवण म्हणून एकशे तीन सभा घेतल्या जाणार आहेत या उपक्रमाअंतर्गत सहभागी होणाऱ्या मावळ्यांना पंजाब येथील हुसेनी वाला व खेम करण सीमेवरील सेनादलाच्या जवानांशी संवाद साधता येईल याशिवाय सुरक्षा बंकर ,लष्कराची शस्त्रसामग्री जवळून पाहण्याची संधी मिळेल. याशिवाय सीमा भाग देखील पाहता येईल उत्तरेतील 35 भुईकोट किल्ले 22 गिरीदुर्ग आणि ३३तीर्थक्षेत्र त्यांचा इतिहासाचा उजाळा या निमित्ताने घेण्यात येणार आहे