किमान वेतन सल्लागार मंडळावर केशव घोळवे

पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक तथा कामगार नेते केशव घोळवे यांची महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वतीने बुधवारी (दि. 14) मंडळाच्या अध्यक्षांसह इतर प्रतिनिधींच्या नियुक्त्या जाहीर केल्या.
केशव घोळवे मागील अठरा वर्षांपासून कामगार चळवळींमध्ये काम करत आहेत. त्यामुळे त्यांची एक जाणकार आणि अभ्यासू कामगार नेता म्हणून ओळख आहे. त्यांनी विदेशातील आंतरराष्ट्रीय श्रम संघटना (आयएलओ), जागतिक परिषद, एशिया परिषद आदींमध्ये सभाग घेतला आहे. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा राज्य सरकारला औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचे किमान वेतन ठरविताना फायदा होणार आहे. त्यातूनच त्यांची या मंडळावर निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळातील सर्व सदस्य महाराष्ट्र राज्यातील उद्योग क्षेत्रातील कामगारांच्या किमान वेतनाबाबत अभ्यास करून किमान वेतन दराबाबत आवश्यक सल्ला, तसेच शिफारशी शासनाकडे सादर करत असतात.

Review