नव्या वर्षात पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती...

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पुणे पोलीस आयुक्तांनी घेतला असून पुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे.
याआधीही अनेकदा पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली होती. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. मात्र पोलीस आयुक्तांनी नव्याने हा निर्णय घेतला आहे. यामुळे पुण्यात पुन्हा एकदा नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.हेल्मेटमुळे मानदुखी जडते, आजूबाजूचे दिसण्यात अचडण येते असा आक्षेप घेत आधी सार्वजनिक वाहतूक सुधारा, वाहतूक नियोजन तसंच रस्त्यांची स्थिती सुधारा अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.

Review