केंद्राई गोशाळेत वसुबारसेचा कार्यक्रम उत्साहात पार....
"मंगलमुर्ती ग्रुप संचालित केंद्राई गोशाळेमध्ये" अतिशय उत्साहात आणि नागरिकांच्या उत्स्पुर्त प्रतिसादात "गोवत्स पुजन" पार पडले.
याप्रसंगी देहु गावांतील "विश्वकल्याण मानव सेवा संस्थेच्या" अनाथ बाल वारकऱ्यांच्या उपस्थितीत हरिपाठ आणि भजन - कीर्तनाचा कार्यक्रम झाला. परिसरातील महिलांनी गोमातेच्या पुजनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती, लहान मुलांपासुन ते आबाल वृद्धांपर्यंत सर्वांनी गोमातेला गोग्रास देऊन वारकर्यांसोबत भजनाचाही आनंद घेतला तसेच महिलांनी फुगड्या खेळण्याचाही आनंद घेतला, या बाल वारकऱ्यांना उपस्थित लोकांनी व मंगलमुर्ती ग्रुपच्या वतीने त्यांच्या भवितव्यासाठी आर्थिक स्वरुपात तसेच अन्नधान्य स्वरुपात भरभरून मदत केली.
तसेच संभाजीनगर येथील आहेर परिवाराच्या मिल्क प्लांट डेअरी फार्मच्या वतीने गोमातेसाठी पाचशे किलो चारा उपलब्ध करून देण्यात आला, याप्रसंगी विविध क्षेत्रातील नामांकित मंडळीनीही गोमातेला गोग्रास देऊन दर्शन घेतले, यामध्ये मंगलमुर्ती ग्रुप संचालित केंद्राई गोशाळेचे धनंजय उत्तम गावडे, उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीद, दिशा सोशल फौंडेशनचे सचिन साठे, पतंजली परिवाराचे डाँ. अजित जगताप, प्रसिद्ध निवेदक कैलास काका गावडे, गजानन महाराजांचे थोर भक्त आणि वैद्य गजानन खासनीस, वृद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण व अन्य मंडळीही उपस्थित होती, या सर्व मान्यवरांच्या हातुन गोमातेची आरती करून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.