‘माझा बी.कॉमचा पेपर बिघडल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’,...
बी.कॉम. चा पेपर बिघडल्यामुळे आईने मुलासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली.
रुपाली आशिष गुज्जेवार (२८) व अभीर आशिष गुज्जेवार (५) रा. पी.एच.नगर. जुना पॉवर हाऊसजवळ चंद्रपूर, असे मृत मायलेकाचे नाव आहे.
अभीर बेपत्ता झाल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल झाले. गुज्जेवार कुटुंबीयांनीही दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलिसात केली होती. दरम्यान, रामाळा तलावाच्या काठावर अभीरची चप्पल पडून असल्याचे एका व्यक्तीला दिसले. त्यांनी याबाबत गुज्जेवार कुटुंबीयांना कळविले होते. दरम्यान, बुधवारी रामाळा तलावात गेलेल्या मच्छिमारांना रुपाली व अभीरचा मृतदेहच आढळून आला. याबाबतची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक कोळी, उपपोलीस निरीक्षक रामटेके यांनी तलावातून दोन्ही मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. तसेच प्रेत शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला
रुपाली हिचे पती चंद्रपुरात एका वाहनाच्या शोरुममध्ये काम करतात. रुपाली यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपली बॅग शिकवणी वर्गात ठेवली होती. त्यातील एका डायरीत तिने आत्महत्येचे कारण नमूद करून ठेवल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले. ‘माझा बी.कॉमचा पेपर बिघडल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’, असे रुपाली यांनी डायरीमध्ये लिहून ठेवले आहे,