तुकाराम मुंढे यांची बदली ही दुर्दैवी बाब - अण्णा हजारे
३ वर्षे होण्याअगोदर बदली होणे चुकीचे आहे. वारंवार बदल्यांमुळे अधिकाऱ्यांची चांगले काम करण्याबद्दल उदासीनता तयार झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही हजारे यांनी उपस्थित करत दबावातून झालेली मुंढे यांची बदली ही दुर्दैवी बाब असून त्याचे आपणास वाईट वाटल्याची टिप्पणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे केली.
नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या झालेल्या बदलीबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. चांगल्या अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बदल्या होणे म्हणजे समाज, शहर व राज्याचे नुकसान असल्याचे हजारे यांनी सांगितले.