आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त "चला हवा येऊ द्या"...
भोसरी विधान सभेचे आमदार महेश लांडगे यांच्या "वाढदिवस सप्ताह" निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने "चला हवा येऊ द्या" या मराठी विनोदी कार्यक्रमाचे आयोजन "महापौर राहुलदादा जाधव स्पोर्ट्स फौंडेशनच्या" वतीने करण्यात आले आहे,
१ डिसेम्बर २०१८ रोजी साय. ७ वाजता हा कार्यक्रम रामायण मैदान, जाधववाडी, चिखली येथे होणार असून या कार्यक्रमाला भाऊ कदम, निलेश साबळे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे असे विनोदवीर आपली कला सादर करणार आहेत,अशी माहिती महापौर राहुल जाधव आणि श्री दत्त दिगंबर महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्ष मंगल जाधव यांनी दिली आहे.
आमदार लांडगे यांच्या कार्याचा गौरव करणे आणि ते समाजासाठी जे कार्य करत आहे त्या बद्दल आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असून हा सर्व कार्यकर्त्याचा सन्मान आहे, असे महापौर जाधव यांनी सांगितले.