चाकण हद्दीत सुमारे साडे दहा लाखाचा गुटखा जप्त, तिघांना अटक.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवार (दि.२६) आणि मंगळवार (दि.२७) दरम्यान केलेल्या कारवाईमधून विविध कंपन्यांचा तब्बल १० लाख २८ हजार ४०० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
शिवा पुरुषोत्तम तुप्तेवार (रा. सॅफरॉन सिटी, आंबेठाण चौक, चाकण), उमाकांत कोंडीबा वाघमारे (रा. कुरुळी गायकवाड वस्ती, चाकण) आणि ओमप्रकाश विरमाराम विश्नोई (रा. शिवकृपा कॉम्लेक्स चाकण) असे अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.२६) आणि मंगळवार (दि.२७) दरम्यान चाकण पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखेकडी अंमली पदार्थ विरोधी पथक गुटखा तस्करी विरोधात तपासणी करत असता आरोपी शिवा याच्या ताब्यातील कार (क्र.एमएच/१४/जिएस/२८२२), उमाकांत याच्या ताब्यातील छोटा हत्ती टेम्पो (क्र.एमएच/१४/ईएम/२९८५) आणि ओमप्रकाश याच्या ताब्यातील पियागो टेम्पो (क्र. एमएच/१२/क्युइ/२०२७) मधून विविध कंपन्यांचा एकूण १० लाख २८ हजार ४०० रुपये किमतीचा गुटखा आणि तंबाखू जप्त करण्यात आली. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या गाड्या देखील जप्त करण्यात आल्या. या तिघा आरोपींविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ तपास करत आहेत.

Review