घटस्फोट पाहिजे म्हणून पत्नीला चढवले एचआयव्ही संक्रमित रक्त ?
घटस्फोट पाहिजे म्हणून नवऱ्याने सलाईनमधून एचआयव्ही संक्रमित रक्त शरीरात चढवल्याचा आरोप एका वर्षीय महिलेने केला आहे.
या महिलेला जानेवारी महिन्यापासून एचआयव्हीची लागण झाली आहे. मागच्यावर्षी मार्च महिन्यात आजारी असताना नवऱ्याने एचआयव्ही संक्रमित सलाईन लावल्याचा आरोप महिलेने केला आहे. वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी ही माहिती दिली.
प्रकृती ढासळल्यानंतर या महिलेने रक्ताच्या काही चाचण्या केल्या त्यामधून एचआयव्हीची लागण झाल्याचे समजले. आपले नवऱ्या व्यतिरिक्त कुठल्याही परपुरुषाबरोबर शारीरीक संबंध नव्हते असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. महिलेला एचआयव्हीची लागण झाली आहे त्यासाठी नवरा जबाबदार आहे का ? त्यासंबंधी पोलिसांनी अजून तपास सुरु केलेला नाही. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे.