पत्नीच्या छळाला कंटाळून आंबेगावात तरुणाची आत्महत्या...
पत्नीकडून केलेल्या जात असलेल्या भांडणाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
किसन वाघमारे (वय ३५, रा़ आंबेगाव बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
किसन वाघमारे यांचा २०१० मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांची पत्नी सतत वेगवेगळ्या कारणावरुन त्यांच्याशी वाद घालत होते. राहते घर माझ्या नावावर करुन दे, असे तिचे म्हणणे होते. यामुळे घरात नेहमी भांडणे होत होती. या मानसिक त्रासाला कंटाळून १६ नोव्हेंबर रोजी किसन यांनी दुपार तीनच्या सुमारास घरात कोणी नसताना सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.
सहायक पोलीस निरीक्षक एस़ पी़ यादव अधिक तपास करीत आहेत.