उत्तर प्रदेश, बिहारमधील नेत्यांना महाराष्ट्रात प्रवेशबंदी - उत्तर भारतीय महापंचायतीचा निर्णय...राज इफेक्ट

उत्तर प्रदेश, बिहारमधील नेत्यांना मुंबई आणि महाराष्ट्रात प्रवेशबंदी करण्याचा उत्तर भारतीय महापंचायत समितीने निर्णय घेतला आहे. जोपर्यंत रोजगार देत नाही तोपर्यंत नेत्यांना प्रवेश करु देणार नाही अशी घोषणा त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रात इतके उद्योग का येत आहेत याचा विचार तुम्ही केला पाहिजे. उद्योग उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गेले पाहिजेत असं मला वाटत आहे. पण तुम्ही सगळे इथे येतात. प्रत्येक राज्याची एक क्षमता असते, जर ती ओलांडली तर इथे राहणाऱ्यांनी काय करायचं. महाराष्ट्र पोलिसांना त्यांचा सर्वात जास्त वेळ कुठे जातो विचारा. जे गुन्हे होत आहेत त्यांचा तपास उत्तर प्रदेश, बिहार सीमारेषेवर सुरु आहे. इथे गुन्हा करतात आणि तिथे पळून जातात. 1995 मध्ये महाऱाष्ट्रात एक स्कीम आली झोपडपट्टीवासियांना मोफत घरं….त्यानंतर परिस्थिती बदलली असं राज ठाकरे यावेळी बोलले.
राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला केलेल्या वक्तव्य नंतर उत्तर भारतीय महापंचायतीने हा निर्णय जाहीर केला.

Review