पुणे-मुंबई महामार्गावर दोन अपघातात दोन जणांचा मृत्यू

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

पहिला अपघात कामशेत पिंपोळी गावच्या हद्दीत पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास झाला. ट्रक आणि झायलो गाडीच्या या अपघातात झायलोमधील दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. हे सर्व प्रवासी मुंबईला चालले होते.

तर दुसरा अपघात कामशेत बोगद्याजवळ मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येत असताना झाला. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. गाडी थेट डीवायडरला धडकली यात चालक गंभीर जखमी झाला असून सर्व जखमींना खासगी रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे.

Review