गरीब माणसाच्या तोंडात रोज दोन घास गेले तर ते मला देवळात गेल्यासारखेच वाटेल - नाना पाटेकर

मराठवाड्यात एक मूठ धान्य आणि एक पेंडी चारा प्रत्येकाने दिला तर मराठवाड्यातील जनावरांना आणि माणसांना हातभार लागेल. गरीब माणसाच्या तोंडात रोज दोन घास गेले तर ते मला देवळात गेल्यासारखेच वाटेल असे विधान नाना पाटेकर यांनी केले.
राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग आणि ग्रीन थंब या संस्थेच्या माध्यमातून खडकवासला बॅकवॉटरमधील गाळ साफ करण्याच्या चौथ्या टप्प्याचे आज उद्घाटन अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाम फाऊंडेशनकडून पाच पोकलन या उपक्रमासाठी देण्यात आले

कुणी काय करायचे हे त्यांच्यावर आहे. मला जे करावेसे वाटते ते मी करतो. गरीब माणसाच्या तोंडात रोज दोन घास गेले तर ते मला देवळात गेल्यासारखेच वाटेल त्यामुळे तुम्हाला मंदिर बांधयाचे असेल तर बांधा. पण मला जे काम करायचे आहे मी करत आहे असेही नाना म्हणाले.

Review