राम मंदिर बांधायला काँग्रेसची आडकाठी - योगी आदित्यनाथ

अयोध्येत राम मंदिर बांधायला काँग्रेसची आडकाठी आहे. काँग्रेस पक्ष कुणासाठी काम करतोय हे आपल्याला आधी समजून घ्यावे लागेल.काँग्रेस आणि टीआरएस हे दोन्ही पक्ष मुस्लिमांसाठी काम करणारे पक्ष आहेत. धार्मिक आधारावर ते योजना बनवतात, असा गंभीर आरोप काँग्रेसवर करताना भाजपा सर्वांना सुरक्षा देण्याचे काम करणार असून कोणालाही अराजकता माजवण्याची परवानगी देण्याचे काम करणार नाही. केंद्रातील मोदी सरकारने गेल्या साडे चार वर्षात ‘सबका साथ, सबका विकास’, हाच कार्यक्रम हाती घेतला आहे,
तेलंगणातील विकराबादमधील तंदूर विधासभा मतदारसंघातील एका प्रचारसभेत योगी आदित्यनाथ बोलत होते.

तेलंगणात 7 डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यानंतर 11 डिसेंबरला मतमोजणी होईल.

Review