छावा युवा संघटनेतर्फे मराठा आरक्षणासाठी आत्मबलिदान करणाऱ्यांना श्रद्धांजली...

छावा युवा संघटनेतर्फे आज श्री संभाजी महाराजांच्या प्रतिकृती येथे पणत्या लावून मराठा आरक्षणासाठी ज्या बांधवांनी आत्मबलिदान दिले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली
याप्रसंगी छावा युवा संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अभय भोर यांनी सांगितले बलिदान देणाऱ्या प्रत्येकाच्या घरातील सदस्याला केंद्र व राज्य मध्ये वरिष्ठ जागी नोकरी द्यावी व त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे जर वेळीच आरक्षण मिळाले असते तर ते नाहक बळी गेले नसते तसेच मराठा आरक्षण कायदा संसदेत लवकरात लवकर ठराव पास करून लवकर त्याची अंमलबजावणी करावी आणि मराठी समाजाला नोकरी उद्योग-व्यवसायात काय सवलती मिळतील मध्यमवर्गाला समजेल असे सांगावे असे छावा युवा संघटनेचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले
यावेळी यावेळी महाराजांच्या प्रतिकृती अभय भोर यांच्या हस्ते हार घालण्यात आला तसेच मराठा समाजाच्या सर्व मुलांना व नागरिकांना या आरक्षणाचा फायदा व्हावा असे साकडे घालण्यात आले विद्यार्थ्यांतर्फे अवंतिका भोर यांनी वय वर्ष अकरा मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल नक्कीच विद्यार्थी सर्व क्षेत्रात प्रगती करतील आणि त्याबद्दल आभार मानले जवळ 42 दिवे लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात तसेच कैवारी अण्णासाहेब पाटील यांना हार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष अभय भोर, विनायक खूटाळ, सुरेश अलगुडे, अश्विन डेंगळे, प्रमोद पवार , ऋग्वेद डेंगळे, स्वप्नील भरगुडे, संतोष गायकवाड, पवन कलमदाने, दुर्गा भोर, गणेश विटकर ,अवंतिका भोर, विद्यार्थी तसेच सामाजिक सर्व स्तरातील कार्यकर्ते उपस्थित होते

Review